शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:09 IST

Ajit Pawar : "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.

सांगली - राज्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढ वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी नाव न घेता केंद्रीयमंत्र्यांच्या दौऱ्यात असे संबोधत नारायण राणेंना वक्तव्याची दखल घेतल्याचं दिसून आलं. 

"सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असंही राणे म्हणाले. राणेंच्या या संतापाची दखल घेत, आता नोडल ऑफिसर नेमण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. 

अजित पवार यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या पूरग्रस्त भागात पाहणी दौरे सुरू आहेत, यापुढेही ते सुरूच राहतील. केंद्रीयमंत्री आले होते, विरोध पक्षाचे नेते आले होते. विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करेलच. तर, सरकारच्याबाजूचे लोकं मदतीसाठी प्रयत्न करतील. पण, यापुढे जिल्हाधिकारी यांना वेळ मिळावा म्हणून नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यातील मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत नोडल ऑफिसर फिरेल. बाकीचे सर्व सनदी अधिकारी आपल्या कार्यालयातून कामकाज पाहतील, असे अजित पवार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त, सीईओ, एसपी हे सर्व अधिकारी आपलं काम पाहतील, असेही पवार म्हणाले. 

नायतर प्रत्येकजण इथं येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला... अरे कशाला गेला.. कशाला गेला... म्हणजे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याचा तो प्रोटोकॉल आहे, त्यानुसार त्यांना तेथे जावंच लागतं. उद्यापासून अजून दौरे वाढतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे अजित पवारांनी सांगितलं. 

भाजप नेत्यांकडून पाहणीकेंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ," असं राणे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते. 

मुख्यमंत्र्यांवर टीका"राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे,. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?," अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarayan Raneनारायण राणे chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSangliसांगलीfloodपूर