शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

काही पुढारी राज्याचे, देशाचे राजकारण करतात; मात्र.., अजितदादांनी काढला जयंतरावांचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:18 IST

अजित पवारांनी सरपंच व गावचा प्रमुख म्हणून उल्लेख करताना जयंतरावांना तरी चिमटा काढला नाही ना, अशी चर्चा सध्या सांगलीत रंगली आहे.

सांगली : काही पुढारी राज्याचे, देशाचे राजकारण करतात, मात्र गावातला सरपंचसुद्धा त्यांचे ऐकत नाही. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेला उपक्रम राबविताना किमान आपल्या गावातील प्रमुख तरी आपल्या विचाराचा असावा, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादीच्यावतीने मुंबईत पार पडलेल्या व्हर्च्युअल रॅलीवेळी अजित पवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांनी नवा उपक्रम जाहीर केला आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक पुढाऱ्याने महिन्याच्या पहिल्या शनिवारी गावाकडे जाऊन लोकांशी संवाद साधायचा. त्यांचा हा उपक्रम चांगला आहे, मात्र मनात त्यातून काही शंका उपस्थित झाल्या.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पुढाऱ्याने त्यांच्या गावातील प्रमुख किंवा सरपंच आपल्या विचाराचा असावा, याची काळजी घ्यावी. काही पुढारी राज्याचे व देशाच्या राजकारणात काम करतात आणि गावातील सरपंचसुद्धा त्यांचे ऐकत नाही. असे चित्र दिसता कामा नये. गावपातळीवर आपल्या विचाराच्या माणसांची बांधणी करायला हवी, असे त्यांनी सांगितले.इशारा कोणाला, याची चर्चाजयंत पाटील यांच्या इस्लामपूर शहरातील नगरपालिकेत विरोधी विकास आघाडीची सत्ता आहे. भाजपचा नगराध्यक्ष आहे. अजित पवारांनी सरपंच व गावचा प्रमुख म्हणून उल्लेख करताना जयंतरावांना तरी चिमटा काढला नाही ना, अशी चर्चा सध्या सांगलीत रंगली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस