शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ढगात भरकटलेले अजितदादांचे हेलिकॉप्टर…अन् नियतीने वाचवलेला क्षण; तो थरारक प्रसंग आज पुन्हा आठवणींतून समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:16 IST

कडेगाव (जि. सांगली ) : काळ कधी कुणासाठी काय घेऊन येईल, हे सांगता येत नाही. १५ जून २०१५ रोजी ...

कडेगाव (जि. सांगली) : काळ कधी कुणासाठी काय घेऊन येईल, हे सांगता येत नाही. १५ जून २०१५ रोजी सकाळी घडलेला एक थरारक प्रसंग आज पुन्हा आठवणींतून समोर आला; पण यावेळी तो प्रसंग दिलासा देणारा नसून, हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे. अजित पवार हे त्या दिवशी औंध (ता. खटाव) येथून हेलिकॉप्टरने कराडकडे रवाना झाले होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यांना मुंबईला तातडीने पोहोचणे आवश्यक होते. मात्र, सुरली घाट परिसरात पोहोचताच अचानक दाट ढगाळ हवामान निर्माण झाले. क्षणात दृश्यता कमी झाली आणि हेलिकॉप्टर दिशाभूल होऊन भरकटले. तो क्षण जीवघेणा ठरू शकला असता; परंतु पायलटने दाखवलेल्या विलक्षण प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. परिस्थितीचा अचूक अंदाज घेत हेलिकॉप्टर कडेगाव एमआयडीसी परिसराकडे वळवले आणि सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या दत्त टेक्सटाइलच्या मोकळ्या मैदानावर ते सुरक्षितपणे उतरवले. मात्र, अजित पवार यांचा प्रवास थांबणे शक्य नव्हते. त्यांच्या स्वीय सहायक नितीन काटकर आणि अंगरक्षक पाटील यांनी तातडीने जवळील विद्याश्री टेक्सटाइलमध्ये धाव घेतली. तेथे कारमधून त्यांना कराड विमानतळावर सुरक्षितपणे पोहोचवले. पुढे मुंबईत पोहोचल्यानंतर अजित पवार यांनीही हा प्रसंग अनेकांना सांगितला होता. “ढगात भरकटलेले हेलिकॉप्टर आणि थोडक्यात टळलेला धोका” हा किस्सा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणींपैकी एक ठरला होता. त्या दिवसाची आठवण कडेगाव तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या मनात पुन्हा जिवंत झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Dada's helicopter lost in clouds, narrowly escaped disaster in Sangli.

Web Summary : In 2015, Ajit Pawar's helicopter, en route to Karad, got lost in dense fog near Sangli. Averting a potential disaster, the pilot landed safely in a nearby textile mill's field. Pawar then reached Karad airport by car, recalling the near-miss.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीSangliसांगलीSatara areaसातारा परिसर