Air quality will improve in 4 cities in the state! | राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

ठळक मुद्देराज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी

संतोष भिसे 

सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.

स्थानिक महापालिकांच्या मदतीने आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. नागपूर येथील निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई आयआयटीने आराखडा तयार केला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद यासह १७ शहरांतील हवेतील प्रदूषणाच्या तीव्रतेची नोंद घेऊन त्यावरील उपाय आराखड्यात सुचवले आहेत.

येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी करायची आहे. पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.

Web Title: Air quality will improve in 4 cities in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.