शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील साखराळेचा सुपुत्र बनला नीती आयोगाचा कृषी सल्लागार, पंतप्रधान मोदींसमवेत काम करण्याचा मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:46 IST

नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था

युनूस शेखइस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारच्या कृषी व संलग्न विषयाचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.डॉ. कुलकर्णी हे कृषी धोरण अभ्यासक आहेत. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून काम पाहतात. नवी दिल्ली येथील भारतीय ॲग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील प्रख्यात स्वाहिली विद्यापीठाने त्यांचा डी.लिट. पदवी देऊन गौरव केला आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वामीनाथन कमिशन : ए फाउंडेशन ऑफ फार्म्स पॉलिसिज इन इंडिया या त्यांच्या पुस्तकाला भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम.एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना लाभली आहे.स्वामीनाथन आयोगावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. कुलकर्णी यांच्या समन्वयातून समग्रतेकडे या पुस्तिकेची निवड शासकीय निवडक ग्रंथ सूचित केली आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी १९ आंतरराष्ट्रीय व १२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सर्वोच्च धोरण संस्थेचा भाग बनल्याने कौतूककाही काळ त्यांनी जम्मू-काश्मीर विद्यापीठात वरिष्ठ संशोधक म्हणूनही काम केले आहे. शेती व शेतकरी धोरणांच्या संशोधन क्षेत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यामुळे फॉक्सक्लूज या संस्थेने बनवलेल्या भारतातील सर्वोच्च १०० प्राध्यापक, संशोधक व शिक्षकांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वोच्च धोरण संस्थेत झालेल्या या नियुक्तीमुळे डॉ. शशांक कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीNIti Ayogनिती आयोगAgriculture Sectorशेती क्षेत्र