शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळच्या ठरावाविरोधात आयुक्तांना साकडे

By admin | Updated: April 28, 2015 00:32 IST

महापालिका : सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी केली ठराव रद्दची मागणी

सांगली : महापालिकेच्या सभेत ऐनवेळच्या विषयात घुसडण्यात आलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे केली. महापौर विवेक कांबळे यांच्या कारभाराविरोधातील नाराजीतून त्यांनी आयुक्तांना याबाबतचे साकडे घातले. महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधाऱ्यांच्या दोन गटात जोरदार वाद सुरू झाला आहे. महापौर विवेक कांबळे यांचा एक गट, तर गटनेते किशोर जामदार यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू केली आहे. महापौरांनी गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मिरज पॅटर्नचा प्रकार महापालिकेत चालू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दुसरीकडे महापौर कांबळेच किती भ्रष्ट आहेत, याचे पुरावे जामदार गट देत आहे. सभापती मेंढे यांनी काही दिवसांपूर्वी कांबळे यांच्या काळात झालेल्या ऐनवेळच्या ठरावांची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरू होते.या ठरावांविरोधात आता महापौरविरोधी गटाने आंदोलन उभारले आहे. सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोमवारी आयुक्तांकडे सादर करण्यात आले. पंधरा नगरसेवकांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. ऐनवेळचे सर्व ठराव बेकायदेशीर आहेत, त्यामुळे ते विखंडित करण्यात यावेत, अशापद्धतीने सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऐनवेळच्या ठरावांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. आयुक्त कारचे यांनी सांगितले की, कायदेशीर बाबी पडताळून घेण्यात येतील. त्यानंतर ठरावांबाबत निर्णय घेतला जाईल. सभागृहाचे तसेच महापालिकेचे कामकाज या विषयावर नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेवक दिलीप पाटील, निर्मला जगदाळे, बबिता मेंढे, शेवंता वाघमारे, सुनीता खोत, संतोष पाटील आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदन पाटील यांची बैठकसत्ताधारी गटात गोंधळ सुरू असल्याने काही तटस्थ नगरसेवकांनी, याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार मदन पाटील यांनी येत्या दोन दिवसात महापालिकेत बैठक घेऊन या वादावर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. नेत्यांच्या बैठकीतही हे दोन गट आमने-सामने येणार असल्याने याठिकाणीही वादावादी होण्याची चिन्हे आहेत.टक्केवारीसाठीच महापालिकेत वाद : पतंगराव कदममहापालिकेतील संघर्षाबाबत सत्ताधारी गटाचे नेते आ. पतंगराव कदम म्हणाले की, टक्केवारीसाठीच महापालिकेत सध्या वाद सुरू आहेत. लोक हे सर्व पाहात आहेत. ज्या विश्वासाने लोकांनी सत्ता दिली आहे, त्याच विश्वासाने कारभार करण्याची गरज आहे. त्यांचा अपेक्षाभंग करू नये. अन्यथा ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतले, तेच तुम्हाला खाली खेचू शकतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सत्ताधारी गटाचा नेता म्हणून लक्ष घालणार आहे. लवकरच सत्ताधारी गटातील नगरसेवक बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वाद घालण्यापेक्षा शहरातील विकास कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.