सांगलीत मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा शासकीय रूग्णालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:21 IST2021-04-05T19:17:58+5:302021-04-05T19:21:18+5:30
Hospital Sangli- टॉन्सीलवरील उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील मुलीचा मृत्यू झाला. प्रतिक्षा सदाशिव चव्हाण (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. यानंतर नातेवाईकासह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही गोंधळ घातला. डॉक्टरांच्या चूकीच्या उपचारामुळेच मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा बघून रूग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगलीत मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा शासकीय रूग्णालयात गोंधळ
सांगली : टॉन्सीलवरील उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील मुलीचा मृत्यू झाला. प्रतिक्षा सदाशिव चव्हाण (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. यानंतर नातेवाईकासह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही गोंधळ घातला. डॉक्टरांच्या चूकीच्या उपचारामुळेच मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा बघून रूग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा जिल्ह्यातील पळसवडे (ता. माण) येथील प्रतिक्षा चव्हाण हिला टॉन्सीलवरील उपचारासाठी कुटूंबियांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रीया झाली होती. यादरम्यान ती बेशुध्द होती. तिचा रक्तस्त्राव सुरू असल्याने डॉक्टरांनी दुसरे ऑपरेशन करावे लागणार असे सांगितले होते. त्यानंतर तिला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चूकीच्या उपचारामुळेच प्रतिक्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिला.