शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:31 IST

किमान चार महिन्यांची प्रतीक्षा, तासगावमध्ये सर्वाधिक ३९ ग्रामपंचायती, उन्हाळी परीक्षेनंतरच मतदान

सांगली : जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. त्यांच्या निवडणुका तातडीने होण्याची शक्यता तूर्त नाही. त्यामुळे तेथे प्रशासकाची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या ग्रामपंचायतींना निवडणुकांसाठी किमान चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.त्यामुळे त्यांच्या निवडणुकांचीही तयारी आयोगाला करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबल्यास या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही लांबणार आहेत. तेथे प्रशासक नेमावा लागेल.सद्य:स्थितीला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्याच निवडणुकांचा घोळ मिटत नसल्याने ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाला फुरसत मिळण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात सरासरी पंधरवड्याला एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहे. निवडणूक आयोग याच निवडणुकीच्या गुंत्यात अडकून पडला आहे. या स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका तूर्त लांबणीवर टाकणे हाच पर्याय आयोगापुढे असेल.फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. हे लक्षात घेता तेथील निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. तेथील उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी किंवा पंचायत समितीतील विस्ताराधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त्या मिळणार आहेत. प्रशासकाला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी मिळू शकतो.फेब्रुवारी महिन्यात १२ वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर १० वीच्या परीक्षा व त्यानंतरच्या टप्प्यात उर्वरित सर्व परीक्षांचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे मतदान केंद्रांसाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध होणार नाहीत. या स्थितीत परीक्षा संपल्यावर व पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका उरकाव्या लागणार आहेत. अन्यथा, पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरशिवाय वेळ मिळणार नाही.सर्वाधिक ग्रामपंचायती तासगाव तालुक्यातफेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या सर्वाधिक म्हणजे ३९ ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात आहेत. त्या खालोखाल जतमध्ये २९, मिरजमध्ये १७, खानापुरात १३ ग्रामपंचायती आहेत. शिराळा आणि वाळवा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी २ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीत संपत आहे.

अशा आहेत ग्रामपंचायतीमिरज - १७, अप्पर सांगली - ९, जत - २९, कवठेमहांकाळ - ११, तासगाव ३९, खानापूर १३, आटपाडी - १०, पलूस - १४, कडेगाव - ९, शिराळा - २, वाळवा - २

English
हिंदी सारांश
Web Title : Administrator Rule Imminent for 155 Gram Panchayats in Sangli District

Web Summary : Elections unlikely for 155 Sangli gram panchayats as terms end in February. Administrators will be appointed due to delays. Zilla Parishad election delays impact the gram panchayat polls. Tasgaon has the highest number of gram panchayats affected.