शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:55 IST

याबाबत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश 

सांगली : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार, खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी नोटीस बजावली आहे. खर्चाच्या नोंदवहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलात दोन लाखांची तफावत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. याबाबत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.उमेदवारांनी दररोजच्या खर्चाच्या नोंदी एका स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर दररोजचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. या दोहोंतील खर्चाची तपासणी प्रशासनामार्फत केली जाते. पाटील यांच्या खर्चाची प्रथम तपासणी प्रभारी निवडणूक निरीक्षकांच्या पथकाकडून २६ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांची तफावत आढळली.जिल्हाधिकारी कार्यालयातील खर्च सनियंत्रण कक्षात सादर केलेल्या लेख्यांनुसार ९ लाख २ हजार ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ हजार ९३३ रुपये आहे. या दोहोंतील तफावत २ लाख ७ हजार ५७५ रुपये आहे. निवडणूक कार्यालयाला सादर केलेला सर्व खर्च नोंदवहीत नोंदविला नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. त्यामुळे नोटीस काढण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत म्हटले आहे की, या त्रुटींची पूर्तता करून ४८ तासांत खुलासा सादर करावा. खुलासा केला नाही, तर २ लाख ७ हजार ५७५ रुपयांची तफावत आपण स्वीकारल्याचे समजले जाईल. ही रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. ही तफावत मान्य नसल्यास त्याबाबतची कारणे सादर करावीत. या कारणांसह जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडे विहित मुदतीत अपील दाखल करावे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjaykaka patilसंजयकाका पाटील