मिरज : मध्य रेल्वेच्याकोल्हापूर-नागपूर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. गर्दी असलेल्या या गाडीला तीन जनरल बोगी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत टाळण्यासाठी जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होती. आता प्रवाशांच्या मागणीनुसार या गाडीला ५ सप्टेंबरपासून जादा जनरल बोगी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांची सोय होणार आहे.कोल्हापूर-नागपूर गाडी पुणे विभागातून दररोज विदर्भात जाणारी दैनंदिन एक्स्प्रेस असून या गाडीला प्रवासी संख्या मोठी आहे. या गाडीला दोनच जनरल बोगी असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या गाडीला जनरल बोगीची संख्या वाढवण्याची मागणी होती त्यामुळे कोल्हापूर-नागपूर या गाडीला जनरल बोगी वाढवण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे.आता कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला ५ सप्टेंबरपासून एक तृतीय श्रेणी वातानुकूलित बोगी डबा काढून तेथे एक जनरल बोगी जोडण्यात येणार आहे. नवीन संरचनेत एकूण ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित बोगी व चार जनरल बोगी असतील. इतर सर्व बोगी पूर्वीप्रमाणेच असतील. जनरल बोगी वाढल्याने सामान्य प्रवाशांना फायदा होणार असल्याचे रेल्वे कृती समितीचे, सुकुमार पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला जादा जनरल बोगी जोडणार, सामान्य प्रवाशांना फायदा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:24 IST