न्यायालयाचा आदेश डावलून बैलगाडीशर्यत घेतल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:33+5:302021-08-18T04:32:33+5:30
दिघंची : न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली असताना आदेश डावलून शर्यती घेतल्यास संयोजक व आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात येणार ...

न्यायालयाचा आदेश डावलून बैलगाडीशर्यत घेतल्यास कारवाई
दिघंची : न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली असताना आदेश डावलून शर्यती घेतल्यास संयोजक व आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा खानापूरचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांनी आटपाडी येथील बैठकीत दिला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिनांक २० ऑगस्ट रोजी छकडा गाडी शर्यतीचे झरे येथे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून आटपाडी येथे बैठक घेत त्यांना निमंत्रित केले होते. मात्र आमदार पडळकर यांनी या बैठकीला प्रतिनिधी पाठवला होता.
संतोष भोर म्हणाले, बैलगाडी शर्यतीला न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे अशा शर्यती आयोजित करणे कायद्याचा भंग आहे. शर्यतीचे आयोजन केले, तर संयोजक व आयोजकांवर कारवाई करण्यात येईल. तरुणांनी व लोकांनी गर्दी करू नये, अन्यथा खटले दाखल करण्यात येतील. छकडा गाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर झरे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून नाकाबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, आटपाडीच्या नूतन तहसीलदार बाई माने, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे बैठकीला उपस्थित होते.