शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'साठी भूसंपादन करा, अडचण येईल तिथे पोलिस बंदोबस्त घ्या; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:48 IST

दोन महिन्यात अहवाल द्या

सांगली : शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही प्रांताधिकाऱ्यांना तातडीने मोजणीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना दिली आहे. भूसंपादनात शेतकऱ्यांचा अडथळा आल्यास पोलिस बंदोबस्त घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिली.शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील १२ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन शक्तिपीठच्या कामाला गती देण्याची सूचना दिली होती. त्यानंतर लगेच जिल्हा प्रशासनाकडूनही शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादनासाठी हालचाली सुरू आहेत, असे दिगंबर कांबळे यांनी सांगितले. कांबळे म्हणाले, जिल्हाधिकारी यांनीही प्रांताधिकारी यांना शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन आणि मोजणी करून घेणेबाबत सूचना दिल्या आहेत. भूसंपादन करून मोजणीचा अहवाल दोन महिन्यात सादर करावा. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून दोन दिवसात मोजणीसाठी लागणारे शुल्क निश्चित करून संबंधीतांकडे भरावे.उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी सदर प्रकल्पाच्या संयुक्त मोजणीसाठी प्रकल्पाच्या मोजणीच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्यास पोलिस संरक्षण घ्यावे. संयुक्त मोजणी अहवाल तयार करून संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे. प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या कामकाजाकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता लागल्यास नियुक्त करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

मोजणीला अधिकारी आल्यास झाडाला बांधणार : दिगंबर कांबळेदडपशाही पध्दतीने महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. म्हणूनच शासनाला जशास तसे उत्तर देण्यात येणार आहे. मोजणीला शेतात अधिकारी, कर्मचारी आल्यास त्यांना झाडाला बांधून ठेवण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी घेऊन देणार नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी न घेता कायदा हातात घेऊन शासन काम करणार असेल तर आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.

..या गावांचा समावेशशक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात बाणूरगड येथे प्रवेश करून कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगीवरून तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीपर्यंत येईल. तेथून मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडीवरून कोल्हापूर जिल्ह्यात निमशिरगाव येथे प्रवेश करणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गGovernmentसरकारFarmerशेतकरी