शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात सराईत गुंडाच्या टोळीकडून युवकाचा खून; हल्लेखोरांचा पळून जाण्याचा प्रयत्न, झटापटीत पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:36 IST

तीन तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या 

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात यापूर्वी दोन खून आणि प्राणघातक हल्ले करत दहशत माजवणाऱ्या सौरभ पाटील या सराईत गुंडाने दोन साथीदारांना सोबत घेत सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आणखी एका २४ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना यल्लमा चौकातील भर वसाहतीमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या संशयितांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.गौरव हेमंत कुलकर्णी (वय २४, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत हेमंत नारायण कुलकर्णी (वय ५४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून या खूनप्रकरणी पोलिसांनी सौरभ सुशील पाटील (रा. यल्लमा चौक, इस्लामपूर), साजीद जहाँगीर इनामदार (गोटखिंडी, ता. वाळवा) आणि विजय ऊर्फ सोन्या धुलुगडे (रा. इस्लामपूर), अशा तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.गौरव कुलकर्णी याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी तो त्याचा मित्र जुबेर मुजावर याच्यासोबत दुचाकीवरून कापूसखेडनाका परिसरात फिरत होता. त्यावेळी मुख्य संशयित सौरभ पाटील याने त्याला जुबेरबरोबर का फिरतोस? असे म्हणत तुला जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली होती. सोमवारी रात्री सौरभने पुन्हा गौरव याला यल्लमा चौकात येण्यास सांगितले होते. त्यामुळे गौरव कुलकर्णी हा त्याच्या दुचाकीवरून सोमवारी रात्री आला होता.त्यावेळी साजीद व विजय या दोघांनी गौरव कुलकर्णी याला धरून ठेवले. त्याचवेळी सौरभ पाटील याने चाकूने वार करत गौरवचा खून केल्याचा ठपका त्याच्या वडिलांनी फिर्यादित ठेवला आहे. या घटनेनंतर तिघाही हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले, तर रक्तबंबाळ होऊन पडलेल्या गौरवला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वर्मी वार बसून अतिरक्तस्राव झाल्याने गौरवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.कारवाईत पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमीया घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोर कामेरीच्या दिशेने निघाल्याचा माग काढत त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी संशयित हल्लेखोर एका शेताच्या बाजूला उभे होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोरांनी पोलिसांशी झटापट करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, हवालदार अमोल सावंत यांना किरकोळ दुखापत झाली. याचवेळी पथकाने या तिघांना जेरबंद केले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस