शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिवरेच्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:39 IST

जीवंत काडतुसासह पिस्तूल जप्त : भिवघाट रोडवर एलसीबीची कारवाई 

दिलीप मोहिते विटा : विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी किशोर विलास जाधव (वय २२, रा. हिवरे, ता. खानापुर)  या तरुणास अटक करण्यात आली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री बेनापूर गावच्या हद्दीत ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पिस्तूल व जीवंत काडतूस असा ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.हिवरे येथील किशोर जाधव हा तरूण विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी गुरूवारी रात्री भिवघाटजवळ करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणारे रोडवर बेनापूर गावचे हद्दीत एका हॉटेलच्यासमोर सापळा लावला. त्यावेळी संशयीत किशोर जाधव तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला हटकले. त्यावेळी तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ ५० हजार रुपये किंमतीचे एक लोखडी धातूचे, सिल्व्हर रंगाचे, मॅगझीन असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व ५०० रूपये किंमतीचे एक जीवंत काडतूस असा सुमारे ५० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला.याप्रकरणी संशयित किशोर जाधव यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम  १९५९ चे कलम ३,२५  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शेंडकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस