शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नव्या दुचाकीची हौस बेतली जिवावर, नेलकरंजी फाट्याजवळ आटपाडीतील युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:33 IST

आनंदाचे दु:खात रूपांतर

आटपाडी : सांगलीहून नवी कोरी दुचाकी घेऊन उत्साहात आटपाडीकडे परतणाऱ्या युवकाचा अंत झाला. नेलकरंजी फाट्याजवळ भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.मृत युवकाचे नाव अमित दशरथ राक्षे (वय २५, रा. साकाडी मळा, आटपाडी) असे असून, जखमी युवकाचे नाव विनायक बनसोडे (रा. आटपाडी) आहे. या प्रकरणी मृत युवकाचे वडील दशरथ राक्षे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री अमित राक्षे आणि त्याचा मित्र विनायक बनसोडे हे दोघे सांगली येथे आर-१५ क्र. एम. एच. १०-डी बी-५७०९ ही दुचाकी खरेदी करून आटपाडीकडे परतत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास भिवघाट ओलांडून नेलकरंजी फाट्याजवळ आल्यानंतर भरधाव वेगातील दुचाकीवरील अमित याचे नियंत्रण सुटले. अचानक दुचाकी वळणावर सावरता न आल्यामुळे ती सरळ रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या बस स्टँडमध्ये जाऊन आदळली. दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला लागून अमितच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला विनायक बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.आनंदाचे दु:खात रूपांतरनवीन गाडी खरेदी करून आनंदाने घरी परतणाऱ्या अमित राक्षेच्या वाट्याला काळ आला. जी गाडी घेण्यासाठी तो हौसेने सांगलीला गेला होता, तीच गाडी त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. आनंदाच्या या प्रवासाचा शेवट इतका भयावह होईल, याचा कोणालाही अंदाज नव्हता. कुटुंबातील कष्टकरी युवकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साकाडी मळा परिसरात आणि आटपाडीच्या मार्केट यार्डातील सौदे बाजारात हळहळ व्यक्त केली जात आहे.