शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:29 IST

पत्नी कॉलेजच्या आवारातच होत्या. घटना कळाल्यानंतर त्या पतीकडे धावल्या. ईश्वरपूर येथील घटना

शिरटे : जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं. त्यांच्या सुखी संसारानं नुकताच उंबरठा ओलांडला होता. मात्र, दीड महिन्याच्या या संसारात नियतीने वेदनांचा कल्लोळ मांडला. महाविद्यालयात मुलांच्या कबड्डी स्पर्धा घेणाऱ्या तरुण प्राध्यापकाचा मैदानातच हार्ट अटॅकने मृत्यू होताच प्रेमविश्वात रमलेली जोडी तुटली अन् महाविद्यालयासह सारं गाव हळहळलं.शिरटे (ता. वाळवा) येथील किरण संभाजी देसाई (वय ३०) हे ईश्वरपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करीत होते. महाविद्यालयातच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे किरण हे बुधवारी सकाळी महाविद्यालयात गेले होते. तेथे कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या. मैदानावर स्पर्धांचे नियोजन करतानाच किरण यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या.

त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले, मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. दीड महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या किरण यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह संपूर्ण गावांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.पत्नी जवळ असतानाच धक्काभर मैदानात ज्यावेळी किरण यांना हार्ट अटॅक आला त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रा. प्राजक्ता देसाई कॉलेजच्या आवारातच होत्या. त्यांना लागलीच ही घटना कळाल्यानंतर त्या पतीकडे धावल्या. किरण यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे पत्नीला सांगण्यात आले. मात्र, लगेचच मृत्यूची बातमी कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला.

आई-वडिलांवर आघातएकुलत्या एका मुलाच्या लग्नानंतरचे सुखाचे स्वप्न डोळ्यांत घेऊन जगणाऱ्या आई-वडिलांना या घटनेने मोठा धक्का बसला. त्यांच्या अपेक्षांचा आधारस्तंभ कोसळल्याने त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू अखंडित वाहत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Young Professor Dies of Heart Attack After Dream Wedding

Web Summary : Tragedy struck Shirte as young professor Kiran Desai, recently married, died of a heart attack during a college sports event. His sudden demise has left his wife, family, and the entire community in deep sorrow. He was only 30 years old.