म्हैसाळ : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. म्हैसाळ येथील सुरज महेश नेमाडे (वय १९) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरज नेमाडे हा अंबिकानगर परीसरात राहत होता. सुरजच्या वडीलांचे निधन झाल्याने आईने मोलमजुरी, घरकाम करून तिन्ही मुलांना वाढविले होते. एका मुलीचे लग्न झाले असून, दुसऱ्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला होता. आज, दुपारी सुरज आपल्या मित्रांसोबत नरवाड रस्ताकडे असणाऱ्या विहिरीत पोहायला गेला होता. सुरजला पोहायला येत होते. त्यामुळे तो नेमका कसा बुडाला हे समजू शकले नाही. विहिरीत असणाऱ्या फुटबॉलला तो चिटकून बसला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.
Web Summary : Suraj Nemade, 19, drowned in a well near Mhaisal while swimming with friends. His body was found clinging to a football. Police are investigating the incident. Nemade's family faced financial hardship after his father's death.
Web Summary : मैसाळ के पास दोस्तों के साथ तैरते समय 19 वर्षीय सूरज नेमाडे की कुएं में डूबने से मौत हो गई। उसका शव फुटबॉल से चिपका हुआ मिला। पुलिस मामले की जांच कर रही है। नेमाडे के पिता की मृत्यु के बाद परिवार को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ा।