शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील अपहृत तरुणाची सांगलीतून सुटका, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:34 IST

सांगली : नाशिक जिल्ह्यातून आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण केलेल्या निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे, जि. धुळे) याची अलकूड ...

सांगली : नाशिक जिल्ह्यातून आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण केलेल्या निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे, जि. धुळे) याची अलकूड फाटा (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सुटका केली.

अपहरण करणाऱ्या शरद बाळासाहेब गलांडे (वय २२, रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ), शंकर दत्तात्रय गिड्डे (वय २२, रा. रामपूरवाडी रस्ता, करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक केली. तिघांना नाशिक ग्रामीणमधील वडनेर खाकुर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.आर्थिक देवाणघेवाणीतून निहाल पवार याचे दि. १६ रोजी संशयित शरद गलांडे व शंकर गिड्डे या दोघांनी करंजगव्हाण (जि. धुळे) शिवारातून बळजबरीने मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर निहाल याच्या सुटकेसाठी त्याच्या नातेवाइकांकडे पैशाची मागणी केली. याप्रकरणी मीनाबाई सुभाष पवार यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिस हवालदार दीपक गायकवाड यांना कवठेमहांकाळ येथील अलकूड फाट्याजवळ संशयित थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अलकूड फाटा येथे जाऊन बंद असलेल्या मका फॅक्टरीच्या आवारात सापळा रचला. फॅक्टरीच्या आवारात काळ्या रंगाची मोटार थांबल्याची दिसली. चौकशीत दोघांनी शरद गलांडे व शंकर गिड्डे अशी नावे सांगितली.

गाडीची तपासणी केल्यानंतर पाठीमागील सीटवर घाबरलेल्या अवस्थेत तरुण आढळला. त्याला खाली उतरवून चौकशी केल्यानंतर निहाल पवार असे नाव सांगितले. तसेच पैशाच्या कारणातून दोघांनी अपहरण केल्याचे सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस