शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:02 IST

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्क्सच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ...

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्क्सच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास महादेववाडी येथील २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. बहिणीशी लग्न लावून दिले नाही याचा राग मनात धरून हल्लेखोराने हे कृत्य केले. संशयित हल्लेखाेरास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.सुहास सुरेश कदम (वय २७, रा. महादेववाडी, ता. वाळवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अक्षय ऊर्फ ओमकार अर्जुन पाटील (रा. नेर्ले) हा संशयित हल्लेखोर आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस उपअधीक्षक थोरबोले, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर हल्लेखोर अक्षय पाटील हा तत्काळ पोलिसांच्या हाती लागला.मृत सुहास कदम याचा शेतीसह वाहन व्यवसाय होता. अक्षय पाटील हा त्याच्याकडील वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यातून त्याने सुहास याच्याकडे ‘तुझ्या बहिणीशी माझे लग्न लावून दे’ असा तगादा लावला होता. अक्षय हा फोन करून सुहासच्या बहिणीस त्रास देत होता. त्यावर सुहासने अक्षयला दोनवेळा ताकीद दिली होती. त्याचा राग अक्षयच्या मनात होता. वर्षभरापूर्वी सुहासच्या बहिणीचे लग्न झाले आहे. तरीही अक्षय तिला फोन करून त्रास देतच होता.मंगळवारी सायंकाळी सुहास कदम हा पेठनाका येथे आला होता. त्याची हल्लेखोर अक्षयबरोबर भेट झाली. तेथून दोघे त्याच सेवा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेले. तेथून बाहेर पडल्यावर दोघे काही अंतरावर आले. यावेळी अक्षयने त्याच्याशी ‘तुझ्या बहिणीचे लग्न माझ्याशी का लावून दिले नाहीस?’ असे म्हणून वाद सुरू केला. रागाने पेटलेल्या अक्षयने आपल्याकडील कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून त्याने सुहासच्या छातीवर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूने कमरेत वरच्या बाजूला दोन वार केले. हे दोन्ही वार वर्मी बसल्याने सुहास तेथेच कोसळून रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला.

परिसरातील नागरिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत आपत्कालीन रुग्णावाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उशिरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. विवेक जयवंत पाटील (३०, रा. इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक सागर वरुटे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीislampur-acइस्लामपूरPoliceपोलिस