शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:14 IST

दिघंचीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

आटपाडी: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगत एका कुटुंबाने तरुणाची फसवणूक करत तब्बल दहा लाखाहून अधिक रुपये उकाळल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडला. याबाबत अमर अप्पासो सूर्यवंशी (रा. खांजोडवादी) याने पोलिस ठाण्यात तरुणी व तिच्या कुटूंबियांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दिघंचीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्नेहा नानासो मोरे, अलका नानासो मोरे, अविनाश नानासो मोरे, नानासो अर्जुन मोरे  (सर्व रा. घनचक्कर मळा, दिघंची), प्रतिभा संतोष जाधव (रा. महूद ता.सांगोला) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, १२ मार्च २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्नेहा मोरे हिचे अमर सूर्यवंशी यांच्याशी लग्न लावून देतो असे सांगत तरुणांचा विश्वास संपादन करत त्याच्याकडून विविध कारणासाठी वेळोवेळी 10 लाखाहून अधिक रक्कम व साहित्य मोरे कुटुंबीयांनी अमर सुर्यवंशी यांच्याकडून घेतले. स्नेहासह त्याने मोरे कुटूंबियांना अनेक वस्तू खरेदी करून दिल्या होत्या.अविनाश मोरे यास सोने, चांदीचे दुकान सुरू करण्यासाठी 18 लाखांची मागणी मोरे कुटूंबानी केली होती. पैसे न दिल्यास विवाह लावून देणार नसल्याची धमकी दिली होती. याबाबत कोणास सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली. त्यामुळे अमर हैराण झाला होता. यानंतर त्याने अखेर आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मोरे कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस