शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयावरून जतमध्ये महिलेस डांबून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:39 IST

जत तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत असल्याचे संदेश व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जत : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या संशयावरून महिलेला डांबून ठेवण्याची घटना जत येथील विठ्ठलनगर (ताड वस्ती) येथे गुरुवारी घडली. गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.जतमधील ताडवस्ती येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता एक महिला मुलांना घेऊन जात असताना दिसून आली. तिला काही महिलांनी पकडून ठेवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या महिलेकडे चौकशी केली. ही महिला शेगाव (ता. जत) येथील होती. ती भंगार गोळा करत असताना तेथील चार महिलांनी तिला पकडून मारहाण केली. तसेच ती मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील असल्याचे समजून डांबून ठेवल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंद करण्यात आला. त्यानुसार जत पोलिसांनी अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार गणेश संकपाळ गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.जत तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत असल्याचे संदेश व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांच्या दफ्तरी तशी कोणतीही नोंद नाही. शाळेत आलेल्या मुलांना न्यायला अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास संबंधित शाळांनी पालकांना दूरध्वनी करून त्या व्यक्तीची खात्री करावी. मगच मुलांना त्यांच्याकडे सोपवावे. शाळा, शेतामध्ये, गावामध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा. संशयास्पद व्यक्तीस मारहाण करू नये, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जत पोलिसांनी केले आहे.काही दिवसांपूर्वी साधूंना मारहाणपंधरा दिवसांपूर्वी जत तालुक्यातील लवंगा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून उत्तर प्रदेशमधील चार साधूंना मारहाण करण्यात आली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी सहा जणांना अटकही केली होती. पंधरवड्यात तालुक्यात दुसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस