Sangli: चँटींग ॲपवर ओळख, लग्नाचे आमिष अन् चार लाखाचा गंडा; सूरतच्या महिलेवर गुन्हा दाखल 

By शीतल पाटील | Published: October 25, 2023 07:25 PM2023-10-25T19:25:11+5:302023-10-25T19:30:45+5:30

सांगली : ऑनलाईन चँटिंग ॲपवरुन प्रेमाचे नाटक करीत सूरत येथील महिलेने सांगलीतील एकास तब्बल ४ लाख ६ हजार २६ ...

A woman from Surat cheated a man from Sangli of Rs 4 lakh by pretending to be in love through an online chanting app | Sangli: चँटींग ॲपवर ओळख, लग्नाचे आमिष अन् चार लाखाचा गंडा; सूरतच्या महिलेवर गुन्हा दाखल 

Sangli: चँटींग ॲपवर ओळख, लग्नाचे आमिष अन् चार लाखाचा गंडा; सूरतच्या महिलेवर गुन्हा दाखल 

सांगली : ऑनलाईन चँटिंग ॲपवरुन प्रेमाचे नाटक करीत सूरत येथील महिलेने सांगलीतील एकास तब्बल ४ लाख ६ हजार २६ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सांगलीतील शहर पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हिमांशु रविंद्र वैद्य (रा. अनंत गंगा भवन मागे, डॉ. आंबेडकर रस्ता सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत घडला. फिर्यादी हिमांशु वैद्य एका कंपनीत समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची जानेवारी महिन्यात एका ॲपव्दारे महिलेशी ओळख झाली. 

त्यानंतर वारंवार एकमेकांशी संवाद झाल्यामुळे महिलेने फिर्यादी वैद्य यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी प्रेमाचे खोटे नाटक केले. तसेच लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत फिर्यादी वैद्य यांच्याकडून ४ लाख ६ हजार २६ रुपयांचे कॉईन घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: A woman from Surat cheated a man from Sangli of Rs 4 lakh by pretending to be in love through an online chanting app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.