मिरज : मिरजेतील एका महिलेने सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.मिरज, सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. मिरजेच्या वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून कोल्हापूर व कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांना जाळ्यात ओढल्याच्या तक्रारी आहेत. मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील फ्लॅटवर बोलावून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आले.संबंधित महिला व तिच्या दोन ते तीन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील एका तरुणाने मिरज शहर पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली आहे.
Web Summary : A woman in Miraj lured youths from Kolhapur and Karnataka via social media, extorting lakhs by blackmailing them with compromising photos and videos. Police have detained the woman and accomplices following a complaint.
Web Summary : मिराज में एक महिला ने सोशल मीडिया के माध्यम से कोल्हापुर और कर्नाटक के युवाओं को लुभाया, और समझौता करने वाली तस्वीरों और वीडियो के साथ ब्लैकमेल करके लाखों की उगाही की। शिकायत के बाद पुलिस ने महिला और साथियों को हिरासत में लिया।