शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 16:21 IST

सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने ...

सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित हर्षवर्धन अंकुश कुंभार (रा.पाटण, जि. सातारा) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, पीडित महिला सांगलीतील डॉक्टर आहे. २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून संशयित हर्षवर्धन याच्याशी ओळख झाली. फेसबुकवर मैत्रीच्या नात्यातून त्यांच्यात संवाद होत होता. दोघांची चांगली ओळख होती. ओळखीतूनच हर्षवर्धन याने आर्थिक अडचण सांगून पीडितेकडून ५० हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर तिला फिरायला जायचे असल्याचे खोटे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.या प्रकारानंतर पीडितेने त्याच्याकडे उसने पैशाची मागणी केली. तेव्हा हर्षवर्धन याने ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो तिच्या व्हॉटस ॲपवर टाकला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तीन कोटी रुपये खंडणी मागितली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणी येऊन मारहाण केली. धमकी देत तिला मोटारीतून निर्जनस्थळी नेत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. तिच्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली.या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत हर्षवर्धन याच्यावर बलात्कार आणि खंडणीचा तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुरुवारी हर्षवर्धनला अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस