शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:27 IST

मुख्याध्यापकांचा शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

सांगली : पूर्व भागातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षकाने मुलींसोबत चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत धाव घेऊन शिक्षकाच्या हकालपट्टीची मागणी केली, अन्यथा शाळा बंद ठेवण्याचा  इशारा  दिला.प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना ग्रामपंचायत सदस्य, पालक व अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संघटक विनोद कोळी यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, हा शिक्षक सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत असभ्य वर्तन करतो. मासिक धर्मामुळे शाळेत येऊ न शकलेल्या विद्यार्थिनींना मारहाण करतो. यातील एका विद्यार्थिनीला ‘तू माझ्या बायकोसारखी दिसतेस’ असे म्हणत विनयभंगही केला आहे.  काही विद्यार्थिनींनी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना शिक्षकाच्या वर्तणुकीची माहिती दिली. सदस्यांनी शाळेत माहिती घेतली असता, मुख्याध्यापकांनी  शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी तातडीच्या बैठकीत शिक्षकाला बोलावून विचारणा केली, तेव्हा त्याने चूक कबूल करत ‘एक वेळ माफ करा’ अशी विनंती केली.पालकांनी सांगितले की, हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. भविष्यात अन्य मुलींसोबत अनुचित गंभीर घटना घडण्यापूर्वीच शिक्षकावर कडक कारवाई करावी.शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी माहिती घेऊन तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे. पालकांनी गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व ग्रामपंचायतीलाही याप्रकरणी कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले आहे.अन्य शाळांमध्येही मुलींची छेडछाडदरम्यान, संबंधित शिक्षक काही महिन्यांपूर्वी अन्य गावात नियुक्तीस होता. तेथेही त्याने मुलींसोबत अश्लील चाळे केले होते. पालक आक्रमक होण्यापूर्वीच बदली झाल्याने बचावला. वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या नावाने पालकांकडून वर्गणी गोळा करून चैनी करण्याची सवय त्याला असल्याचे पालकांनी सांगितले.शाळेत तातडीने संरक्षण समितीची नियुक्तीदरम्यान, मुख्याध्यापकांनी मंगळवारी (दि. ७) ग्रामपंचायतीला तातडीने  एक पत्र दिले. शाळेत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. तथापि, भविष्यात घडू नये म्हणून महिला व किशोरवयीन मुली संरक्षण व विकास समिती गठित केल्याचे सांगितले. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची आकस्मिक बैठक घेण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस