मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे रस्त्यावरील खड्डा चुकावताना दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सुटीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू झाला. अक्षय ऊर्फ नितीन अशोक नरुटे (वय २९, रा. सोनी), असे मृत जवानाचे नाव आहे. कश्मीरमधील श्रीनगर येथे ते भारतीय लष्करात सेवेत होते.अक्षय नरुटे त्यांच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त ते काही दिवसांसाठी गावी आले होते. शनिवारी कामानिमित्त मिरज शहरात जाऊन परत येत असताना पाटगाव येथील पाटील मळा परिसरात रस्त्यावरील खोल खड्डा चुकवताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचक्षणी समोरून येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. अपघातात नितीन नरुटे यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील अमोल लक्ष्मण माने व धनंजय सुरेश पाटील हे गंभीर जखमी असून, त्यांना मिरजेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाटील मळा परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने, खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
Web Summary : A soldier on leave died in Miraj after his motorcycle collided with another while avoiding a pothole. Two others were seriously injured. Villagers blame the poor road conditions for the accident. Police are investigating.
Web Summary : सांगली के मिरज में सड़क के गड्ढे से बचने के दौरान दो मोटरसाइकिलों की टक्कर में छुट्टी पर आए एक सैनिक की मौत हो गई। दो अन्य गंभीर रूप से घायल हो गए। ग्रामीणों ने दुर्घटना के लिए खराब सड़क की स्थिति को जिम्मेदार ठहराया है। पुलिस जांच कर रही है।