शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मोटारीच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार, शाळेतून परतताना घडली घटना; सांगली जिल्ह्यातील उटगी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:56 IST

उमदी/माडग्याळ : उटगी (ता. जत) येथे भरधाव मोटारीच्या धडकेत श्रावणी उमेश लिगाडे (वय १०, रा. उटगी) ही शाळकरी मुलगी ...

उमदी/माडग्याळ : उटगी (ता. जत) येथे भरधाव मोटारीच्या धडकेत श्रावणी उमेश लिगाडे (वय १०, रा. उटगी) ही शाळकरी मुलगी ठार झाली. अपघातात तिची लहान बहीण श्रद्धा (वय ८) गंभीर जखमी झाली. उमदी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.मोटारीच्या धडकेनंतर दोघी जखमी बहिणींना ग्रामस्थांनी उपचारासाठी नेले, पण श्रावणीचा वाटेतच मृत्यू झाला. श्रद्धावर जतमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघी बहिणी उमदी येथील डेफोडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून घराकडे निघाल्या होत्या. उटगी ते उमदी रस्त्यावर काही अंतरावर लिगाडे कुटुंबीयांची शेती आहे. तेथे स्कूल बसमधून दोघी उतरल्या. रस्ता ओलांडून शेताकडे जात असताना उटगीकडून आलेल्या भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.ग्रामस्थांनी उपचारांसाठी जतकडे नेले, पण श्रावणीचा रस्त्यातच मृत्यू झाला. श्रद्धा गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षक व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती.

आजी-आजोबांची भेट झालीच नाहीश्रावणी व श्रद्धाचे वडील उटगी येथे कत्ती वस्तीवर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. लिगाडे कुटुंबीय उटगी गावात राहते. दोघी बहिणी दररोज शाळेतून स्कूल बसधून थेट गावातील घराकडे जातात. पण आज त्यांचे आजी-आजोबा शेतात आले असल्याने त्यांनी बसमधून शेतात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयच काळ ठरला. आजी-आजोबांची भेट झालीच नाही.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू