शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: भरधाव मोटार रसवंतीगृहात घुसून विद्यार्थी ठार, चालक झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:50 IST

खंडोबाचीवाडी गावावर शोककळा

भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे भरधाव वेगाने जाणारी मोटार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे (वय ११) असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.४० च्या दरम्यान घडला. भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंंद झाली आहे.तासगाव-भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी दुपारी या ठिकाणी त्यांचा मुलगा समर्थ बसला होता. यावेळी अचानक भिलवडी स्टेशनकडून   भरधाव वेगाने जाणारी मोटार (क्र. एमएचसीएक्स ४०८१) रसवंतीगृहाच्या शेडमध्ये  घुसली. मोटारीचा वेग इतका भरधाव होता की, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या रसवंतीगृहात घुसली. रसवंतीगृहाची पत्र्याची शेड उचकटून शेतात कोसळली. मोटारीच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने समर्थ शिंदेचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. मोटार तेथेच सोडून चालक पसार झाला होता. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांसह खंडोबाचीवाडी, भिलवडी येथील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेतली.खंडोबाचीवाडी गावावर शोककळासंतोष शिंदे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना  पती, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार होता. मुली १२ वी व १० वी इयत्तेत शिकत असून समर्थ वसंतराव दादा पाटील विद्यालय खंडोबाचीवाडी येथे इयत्ता ५ वीमध्ये शिकत होता. एका बाजूला शासनाने दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असताना दुसरीकडे चालकांचे वाहनांच्या वेगावरचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू