शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मोटार अपघातात इस्लामपूरचे धर्मगुरु जागीच ठार, अन्य तिघे जखमी; टायर फुटल्याने झाली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:42 IST

सांगली : इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ मोटारीचे टायर फुटून विजेच्या खांबावर आदळल्याने इस्लामपूर येथील धर्मगुरू हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ...

सांगली : इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ मोटारीचे टायर फुटून विजेच्या खांबावर आदळल्याने इस्लामपूर येथील धर्मगुरू हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ५०) हे जागीच ठार झाले, तर अस्लम मिस्त्री (६२), समीर सरवर मुल्ला (५०), फैयाज लियाकत इबुशी (५२, सर्व रा. इस्लामपूर) हे तिघे जण जखमी झाले. यापैकी समीर मुल्ला हे गंभीर जखमी आहेत. गुरुवारी हा अपघात घडला.पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, धर्मगुरू बारस्कर हे इस्लामपूर येथील रहिवासी आहेत. सांगलीतील एका कुटुंबाच्या भेटीसाठी ते दुपारी इस्लामपूर येथील अस्लम, समीर आणि फैयाज यांच्यासमवेत मोटार (एमएच १४ बीसी ६६२४) मधून येत होते. लक्ष्मीफाट्याजवळ त्यांच्या मोटारीचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. काँक्रीटच्या रस्त्यावरून मोटार एका बाजूला उलटून खड्ड्यातून फरफटत जात विद्युत खांबावर जोरदार आदळली. 

धडक इतकी जोरात होती की, विजेचा खांब वाकला, तर चालकाच्या शेजारी बसलेले बारस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरून जाणारे वाहनचालक थांबले. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतून जखमींना टिंबर एरियातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमी तिघांपैकी फैयाज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर आहे, तर समीर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली. बारस्कर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजतात समाजबांधव मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

हॉस्पिटलमध्ये गर्दीधर्मगुरू बारस्कर यांना समाजात मानाचे स्थान आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सांगली आणि इस्लामपूर परिसरातील मुस्लीम बांधवांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरAccidentअपघातDeathमृत्यू