शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

सांगलीत चाळीस हजारांची लाच मागणारा पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात, गुन्हा दाखल

By शरद जाधव | Published: March 21, 2023 3:51 PM

गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात केली लाचेची मागणी

सांगली : गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात ४० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रामबाग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अकबर खताळसो हवालदार (वय ५३, रा. वर्धमान इमरड अपार्टमेंट, अल्फान्सो स्कूलजवळ, मिरज) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे.तक्रारदाराचा भाऊ व इतर दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक अकबर हवालदार याने सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने ‘लाचलुचपत प्रतिबंधक’कडे तक्रार दाखल केली.जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देण्यासाठी ६० हजार रुपये लाचेची मागणी करून चर्चेअंती ५० हजार व त्यानंतर ४० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हवालदार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, प्रतिम चौगुले, रवींद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस