शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पिस्तूल रोखले, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 17:49 IST

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

कुपवाड : शहरातील दत्ता पाटोळे याच्या खून प्रकरणात न्यायालयीन कामात मदत केल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षांवर सागर राजाराम माने (वय ३५, रा. राजारामबापू हौसिंग सोसायटी, वाघमोडे मळा, कुपवाड) याच्यावर तीन संशयितांनी पिस्तूल रोखल्याची घटना सोमवारी रात्री घडली, तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुपवाड एमआयडीसी पोलिस, अशी दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. संशयित संदेश घागरे, किरण कोंडिग्रे, अनिकेत कदम (तिघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.सोमवारी रात्री वाघमोडेनगर येथे अनिल माने या तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेला सागर माने हा स्टेजजवळ मोबाइलवर बोलत उभा होता. ही संधी साधून संशयित संदेश घागरे याने हातात पिस्तूल घेऊन आणि शिवीगाळ करीत सागर माने यांच्यावर ते रोखले, तसेच त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलचा खटका दाबला; परंतु ते पिस्तूल फायर झाले नाही.हे कृत्य पाहून घाबरलेला सागर पळून जाऊ लागला. तो पळून जात असताना संशयित घागरे याने त्याचा पाठलाग केला. पळत असताना पाय घसरून सागर रस्त्यावर पडल्याने त्याला दुखापत झाली. यावेळी सागरचा मित्र सरफराज समलेवाले त्याला वाचवण्यासाठी धावले. संशयित संदेश घागरे याच्या हातातील पिस्तूल घेऊन संशयित अनिकेत कदम याने सरफराज समलेवाले याच्यावर रोखून धरले. त्यालाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलचा खटका दाबला; परंतु ते फायर झाले नाही. याबरोबरच संशयित किरण कोंडिग्रे याने सागर माने याला चाकूचा धाक दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. ‘वाचवा वाचवा’ असे म्हणून सागर स्टेजकडे पळत गेला. हा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी येत असल्याचे पाहून संशयितांनी पळ काढला.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयिताच्या शोधासाठी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे व कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२, ३५१(३)(५) आर्म ॲक्ट ३, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस