शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: ईश्वरपुरात ‘संघटनांच्या’ नावाखाली लुटारूंचे जाळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:14 IST

महिला अत्याचार प्रकरणातही ब्लॅकमेल?

अशोक पाटीलईश्वरपूर : “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही म्हण आजही सर्वसामान्यांच्या अनुभवाला येतेच. मात्र, आता परिस्थिती आणखी वेगळी बनली आहे. लोकप्रतिनिधींचा शासकीय यंत्रणेवरील वचक कमी होत चालल्याने अनेक शासकीय कार्यालयांत सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा दरारा वाढल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, फाइल पुढे सरकण्यासाठी ‘वजन’ ठेवावे लागते, नागरिकांच्या तक्रारी आहेत.ईश्वरपूर परिसरातील शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूला विविध स्वयंघोषित संघटनांचे नेते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. संघटनेच्या नावाखाली कार्यालयांमध्ये वावरणे, अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आणि नागरिकांना मदतीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.गेल्या नऊ वर्षांनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतांचा भाव चांगलाच वाढल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींनीही काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ‘मनी प्लॅनिंग’ सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी अनेक कार्यालयांमध्ये फाइल पुढे सरकण्यासाठी पैसे मोजल्याशिवाय पर्याय राहत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

अलीकडच्या काळात माहितीचा अधिकार, तक्रारी आणि पोलिसांची भीती दाखवत काही तथाकथित संघटनांनी आपले जाळे पसरवले आहे. संघटनेचे लेटरपॅड, सोशल मीडियाचा वापर आणि मीडियाची भीती दाखवत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे किंवा अडचणीत असलेल्या नागरिकांना ब्लॅकमेल करणे, अशा प्रकारांची चर्चा जोर धरू लागली आहे. यामध्ये काही महिला संघटनांचाही समावेश असल्याचे बोलले जाते.

वाळवा तालुक्यात नोंदणीकृत नसलेल्या अनेक अनधिकृत संघटनांना अचानक ऊत आला असून, त्यांच्या माध्यमातून विविध प्रकरणांमध्ये ‘मध्यस्थी’च्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे या संघटनांची वैधता तपासून प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून जोर धरू लागली आहे.

महिला अत्याचार प्रकरणातही ब्लॅकमेल?महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात मदत करण्याच्या नावाखाली काही बोगस संघटना सक्रिय झाल्याची चर्चा वाळवा तालुक्यात आहे. महिला आयोगाची भीती दाखवत संबंधित आरोपींना मोठ्या रकमांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. एका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणात आरोपींकडून प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांची मागणी झाल्याची खमंग चर्चा रंगली आहे. त्यामुळे अशा संघटना नोंदणीकृत आहेत का?, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Looters posing as organizations in Ishwarpur? Investigation urged.

Web Summary : Ishwarpur faces extortion by fake organizations exploiting government offices. Allegations include pressuring officials, blackmailing citizens, and demanding money under the guise of assistance, especially in women's rights cases. Locals demand investigation and action.