शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विवाहितेस यात्रेला पाठविण्यावरून वाद; भाच्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:31 IST

अथणी तालुक्यातील मलाबाद येथील घटना : मृत तरुण जत तालुक्यातील संखचा

दरीबडची/अथणी : मलाबाद (ता. अथणी) येथे मावशीला माहेरच्या यात्रेस नेण्यासाठी आलेल्या भाच्याचा सासरच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. गौडेश अर्जुन बालगाव (वय २१, रा. संख, ता. जत), असे मृताचे नाव आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत दाेन्ही कुटुंबांतील चाैघे जखमी झाले आहेत. मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी अथणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संख येथील काशीनाथ रामगोंडा हगलंबी यांच्या बहिणीचा विवाह मलाबाद (ता. अथणी) येथील प्रकाश जडप्पा चौगुला यांच्याशी झाला आहे. संख येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाची यात्रा आहे. यात्रेनिमित्त त्यांचा चुलत भाऊ दयानंद बसगोंडा हगलंबी व मोठ्या बहिणीचा मुलगा गौडेश बालगाव हे दाेघे मलाबाद येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाचे सूप देण्यासाठी गेले होते. सूप दिल्यानंतर गावच्या आयदेशी यात्रेला बहिणीने येण्याचा रिवाज आहे. यात्रेत बहिणीने भावाला अहेर करण्याची प्रथा आहे.यात्रा असल्याने ‘मुलीला माहेरी पाठवा’ अशी विनंती दयानंद हगलंबी व गाैडेश बालगाव यांनी सासरच्या नातेवाइकांना केली; परंतु अगोदरच दाेन्ही कुटुंबांत भांडण असल्याने त्यांच्यामध्ये वादावादी झाली. अशोक जडप्पा चौगुला व प्रकाश जडाप्पा चौगुला यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना बेदम मारहाण केली.हा प्रकार दयानंद हगलंबी यांनी संख येथील नातेवाइकांना फोनवरून कळवला. यानंतर संख येथून त्यांचे अन्य काही नातेवाईक दुचाकीवरून मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मलाबादला पाेहाेचले. रात्री उशिरा त्यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. अंधारात कोण कुणाला मारतोय हेही समजत नव्हते. यावेळी चाैगुला कुटुंबीयांनी धारदार हत्याराने गौडेश बालगाव, काशीनाथ हगलंबी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.दाेघांनाही उपचारासाठी जतला नेत असताना वाटेतच गाैडेशचा मृत्यू झाला. भुताळसिद्ध रामगोंडा हगलंबी (वय ३१), काशीनाथ रामगोंडा हगलंबी (वय ४०, रा. दोघे संख) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. काशीनाथ हगलंबी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मारहाणीत मलाबाद येथील अशोक जडप्पा चौगुले व प्रकाश जडाप्पा चौगुला हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.याबाबत अथणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस निरीक्षक रवींद्र नायकवडी, उपनिरीक्षक शिवानंद कारजोल तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस