खिशामध्येच झाला मोबाइलचा स्फोट, तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 14:57 IST2022-01-22T13:48:33+5:302022-01-22T14:57:46+5:30

या तरुणाने मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवला होता. तोच शर्टच्या खिशात ठेवला असताना तर..

A mobile phone exploded in his pocket, injuring a young man in sangli | खिशामध्येच झाला मोबाइलचा स्फोट, तरुण जखमी

खिशामध्येच झाला मोबाइलचा स्फोट, तरुण जखमी

आटपाडी : खिशामध्ये ठेवलेला फोन गरम होऊन अचानक स्फोट झाल्याने, आटपाडीतील प्राण चव्हाण हा तरुण जखमी झाला. याबाबत त्याने आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे.

आटपाडीतील प्राण चव्हाण या तरुणाने जानेवारी, २०२१ मध्येच आपल्या मित्राच्या नावावर एका नामवंत कंपनीचा सुमारे तीस हजार रुपयांचा मोबाइल विकत घेतला होता. गेल्या वर्षभरापासून प्राण चव्हाण हाच मोबाइल वापरत होता.

दरम्यान, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्राण चव्हाण मित्रासोबत बोलत असताना, त्याला पॅन्टच्या खिशाला ठेवलेला मोबाइल गरम होत असल्याची जाणीव झाली. खिशातून मोबाइल बाहेर काढत असतानाच अचानक माेबाइलचा स्फोट झाला. यामध्ये चव्हाण याच्या मांडीला गंभीर जखम झाली. त्यास सांगलीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या स्फोटाने सर्व जण भयभीत झाले.

अनर्थ टळला

प्राण याने बुधवारी रात्री पॅन्टच्या खिशात माेबाइल ठेवला होता. तोच शर्टच्या खिशात ठेवला असताना स्फोट झाला असता, तर अनर्थ घटना असता, यामुळे मोबाइल कंपनीविरोधात दाद मागणार असल्याचे प्राण चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: A mobile phone exploded in his pocket, injuring a young man in sangli