शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विट्यात किरकोळ वादातून डोक्यात फरशी मारून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:19 IST

संशयित ६ तासांच्या आत गजाआड

विटा : ‘मोबाइलचे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी तुझे आधारकार्ड मला दे, नाहीतर तुला इमारतींच्या रंगकामाची कामे देऊ नका, असे सर्वांना सांगेन,’ अशी भीती घालून सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून डोक्यात फरशीचा घाव घालून राजेंद्र भाऊसो यादव (वय ५८, रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विटा येथील नेवरी नाका येथे घडली.याप्रकरणी तातडीने तपास करून संशयित सागर अशोक वाघमारे (वय ३०, रा. शाहूनगर, विटा) यास विटा पोलिसांनी ६ तासांच्या आत गजाआड केले. कडेपूर येथील राजेंद्र यादव हे इमारत रंगकामाचे काम करतात. संशयित सागर वाघमारे हासुद्धा रंगकाम करतो. या दोघांची जुनी ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सागर वाघमारे व मयत राजेंद्र यादव या दोघांनी नेवरी नाक्यावरील एका देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन केले.त्यानंतर हे दोघेही दुकानाच्या बाहेर असलेल्या गुरूप्रसाद प्लाझाच्या समोरील मैदानात आले. त्यावेळी मयत राजेंद्र यादव यांनी तू बाहेरचा आहेस, तुला रंगकाम देऊ नका, असे मी ठेकेदारांना सांगतो. मला सिमकार्ड घेण्यासाठी तुझे आधारकार्ड दे, असे म्हणून त्रास देऊ लागला. त्यावेळी या दोघांत मोठा वाद झाला.

या वादात संशयित सागर वाघमारे याने जवळच पडलेला फरशीचा तुकडा घेऊन मयत राजेंद्र यांच्या डाव्या बाजूला डोक्यात मारला. त्यावेळी यादव हे जागीच कोसळले. याची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी राजेंद्र यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.विटा पोलिसांना घटनास्थळावरील साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सागर अशोक वाघमारे यानेच मयत राजेंद्र यांच्या डोक्यात फरशीने घाव घालून त्यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित सागर वाघमारे याला विटा पोलिसांनी तातडीने अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता त्यास दि. ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस