Sangli: कोंबड्या खायला आला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; वनविभागाने केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:23 IST2025-09-15T14:22:34+5:302025-09-15T14:23:06+5:30

तीन महिन्यांपासून परिसरात सर्रास वावर

A leopard came to feed the chickens and got stuck in the burrow in Sangli The forest department arrested it | Sangli: कोंबड्या खायला आला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; वनविभागाने केले जेरबंद 

Sangli: कोंबड्या खायला आला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; वनविभागाने केले जेरबंद 

तासगाव : पेड (ता. तासगाव) येथील विठ्ठलनगर परिसरात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अनपेक्षितरीत्या मोठ्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या शिरला. मात्र, नंतर त्याला बाहेर जाता आले नाही. याठिकाणी अडकलेल्या बिबट्यालावनविभागाच्या पथकाने रात्री दोनच्या सुमारास जेरबंद केले.

बीड येथील विठ्ठलनगर परिसरात शिवाजी बापू शेंडगे यांच्या घराजवळ कोंबड्यांसाठी मोठा जाळीचा खुराडा करण्यात आला होता. खुराड्यामध्ये हा बिबट्या अडकलेला आढळून आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बिबट्या जाळीत अडकल्यानंतर नागरिकांनी गोळा होऊन पत्रे आडवे लावून या खुराड्यातच बिबट्याला अडवून ठेवले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कळवण्यात आले. वनविभागाच्या पथकाने रात्री दोन वाजता बिबट्याला जेरबंद केले.

तीन महिन्यांपासून होता वावर

तब्बल तीन महिन्यांपासून पेड परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. पंधरा दिवसांपूर्वी पेढे येथीलच एका वस्तीवर वासरू बिबट्याकडून फस्त करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. अखेर शनिवारी हा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.

Web Title: A leopard came to feed the chickens and got stuck in the burrow in Sangli The forest department arrested it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.