स्वत:वर गोळी झाडून घेत सांगलीतील जवानाने संपवले जीवन, जम्मू-कश्मीरमध्ये बजावत होता सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:35 IST2023-07-08T17:34:51+5:302023-07-08T17:35:05+5:30

दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती

A jawan in Sangli ended his life by shooting himself. Served in Jammu and Kashmir | स्वत:वर गोळी झाडून घेत सांगलीतील जवानाने संपवले जीवन, जम्मू-कश्मीरमध्ये बजावत होता सेवा

स्वत:वर गोळी झाडून घेत सांगलीतील जवानाने संपवले जीवन, जम्मू-कश्मीरमध्ये बजावत होता सेवा

तासगाव : यमगरवाडी (ता. तासगाव) येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय २३) या जवानाने जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने यमगरवाडीसह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयूर दोन वर्षांपूर्वीच भारतीय सैन्य दलात भरती झाला होता.

यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

परिसरात हळहळ

मयूरची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील होती. त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो देशसेवेसाठी सैन्य दलात भरती झाला होता. मात्र त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: A jawan in Sangli ended his life by shooting himself. Served in Jammu and Kashmir

टॅग्स :Sangliसांगली