शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नांदायला येत नसल्याच्या राग, पतीने पत्नीला चाकूने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:55 IST

कडेगाव : कडेगाव येथे नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची गंभीर घटना घडली. वंदना अधिकराव तांबवेकर-पाटील (सध्या ...

कडेगाव : कडेगाव येथे नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची गंभीर घटना घडली. वंदना अधिकराव तांबवेकर-पाटील (सध्या रा. कडेगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे, तर अधिकराव पांडुरंग तांबवेकर-पाटील (वय ४८, रा. शेवाळेवाडी येवती, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत वैशाली प्रकाश पाटील (रा. कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबवेकर-पाटील याला अटक केली आहे.याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अधिकराव व वंदना हे दोघे पती-पत्नी आहेत. दोघामध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी वंदना या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे राहत असलेल्या कडेगाव शहरात राहत आहेत, तर पती अधिकराव हा सातत्याने आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळेवाडी येवती येथे राहूया, अशी विनंती वंदना यांना करत होता; परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे पत्नी वंदना या सासरी शेवाळेवाडी येवती येथे जात नव्हत्या.त्यामुळे याचा राग अधिकराव याच्या मनात होता, तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी त्याने काही एक न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना यांच्या पाठीवर चाकूने मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले, तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या. यावेळी आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला, तर नागरिक व नातेवाइकांनी जखमी वंदना यांना उपचारासाठी कऱ्हाड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस