शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फीसाठी पैसे नसल्याने सांगलीच्या मांगलेतील तरुणीची आत्महत्या, वडिलांनी पोलिसांवर केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:39 IST

कारवाई करेपर्यंत मृतदेह हलवायचा नाही, असा पवित्रा मुलीच्या वडिलांनी घेतल्याने मृतदेह तब्बल आठ तास घरीच होता.

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील पायल रमेश देवकर (वय २०) या फार्मसीच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. शिराळा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करीत कारवाई करेपर्यंत मृतदेह हलवायचा नाही, असा पवित्रा मुलीचे वडील रमेश देवकर यांनी घेतल्याने मृतदेह तब्बल आठ तास घरीच होता. अखेर पोलिसांनी जबरदस्तीने देवकर यांना ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंत्यविधी झाले नव्हते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रमेश देवकर यांचा मांगले बसस्थानक परिसरात अवैध व्यवसाय आहे. त्यांची मुलगी पायल कऱ्हाड येथे फार्मसी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत हाेती. सुटीमुळे ती घरी आली हाेती. तिची फी भरण्यासाठी रमेश यांनी घरी पैसे ठेवले होते. मंगळवारी सकाळी ती कऱ्हाड येथे फी भरण्यासाठी जाणार होती.

दरम्यान, शिराळा पाेलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने रमेश यांना अवैध व्यवसायाच्या हप्त्यासाठी दमदाटी केली. अखेर पायलच्या फीसाठी ठेवलेल्या पैशापैकी काही रक्कम रमेश यांनी त्याला दिली. पायलने वडिलांकडे पैशाची विचारणा केली, त्यावेळी त्यांनी पैसे नसल्याने शिक्षण बंद करण्यास तिला बजावले. यानंतर तिने घरात ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना धक्का बसला.घटनेची माहिती शिराळा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रमेश यांची समजूत काढली. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर रात्री सात वाजता पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शिराळा पोलीस ठाण्यात आणले. पायलच्या आईची समजूत काढून मृतदेह आठ तासांनी उत्तरीय तपासणीसाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. संबंधित पोलिसावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचे रमेश यांनी पत्रकारांना सांगितले.दरम्यान, पायलने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद रमेश देवकर यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस