शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घाटात बस चढत नसल्याने निम्मे प्रवासी उतरले अन् गाडीने घेतला पेट; कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील घटना

By श्रीनिवास नागे | Updated: June 1, 2023 13:47 IST

उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला

कोकरुड : घाटात बस चढत नसल्याने आरामबसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले आणि शंभर मीटरवर जाऊन गाडीने पेट घेतला. उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला. यात प्रवाशांच्या लाखोंच्या रोकडसह आरामबसचे अंदाजे पन्नास लाखाचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत घडली.  रत्नागिरी येथे चायनीज पदार्थांचे गाडे, हॉटेलवरील कामगार, वेटर, स्वयंपाकी, बागायतीतील मजूर, गुरखा, कपडे विक्री, तबेला कामगार यासह विविध कामांसाठी आलेले ५९ नेपाळी महिला-पुरुष हातखंबा (जि. रत्नागिरी) येथून खासगी आरामबसने (एमपी ४१ एमएम २७२७) पुण्याच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आरामबस शिराळा तालुक्यातील कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत आली असता ती पुढे चढत नसल्याने बसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले. शंभर मीटर पुढे घाट चढून गेल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. बसमधील उर्वरित लोक आग लागल्याने खाली उतरून आरडाओरडा करू लागले. आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच साधने नव्हती. त्यामुळे बसमधील प्रवाशांच्या रोख रकमेसह सर्व साहित्य, कपडे, आंबे जळून खाक झाले. कऱ्हाड नगरपालिकेस कळविल्यानंतर पहाटे सव्वापाच वाजता अग्निशमक दलाची गाडी आली, मात्र तत्पूर्वी बसमधील सर्व साहित्य आणि रोख रकमा जळून खाक झाल्या होत्या.  

मोठ्या रकमा जळून खाकरत्नागिरीहून सुटलेल्या आरामबसला आग लागल्याचे समजताच नेपाळी कामगारांचे रत्नागिरी येथील मालक घटनास्थळी हजर झाले. मात्र प्रसारमाध्यमांना बातमी देऊ नका. प्रत्येकाच्या मोठ्या रकमा जळून खाक झाल्याने भरपाई मिळणार नाही, असे सांगत होते. बसमधील लोकांना कोणासोबत बोलण्यास मनाई करत होते. 

भाऊच्या ढाब्याचा आधारघाट संपल्यानंतर सावंतवाडी (ता. शिराळा) येथील वसंत सावंत यांचा ‘भाऊचा ढाबा’ नावाचा ढाबा आहे. जळीत बसशेजारी थांबलेल्या सर्व प्रवाशांसाठी त्यांनी चहा-पाणी, नाष्ट्याची सोय करत आधार दिला.

टॅग्स :Sangliसांगलीfireआगhighwayमहामार्ग