शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पुलावरून ट्रॅक्टर कोसळून शेतकरी ठार, जत तालुक्यातील दुर्घटना

By श्रीनिवास नागे | Published: May 22, 2023 6:13 PM

सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली

श्रीनिवास नागे, सांगली: माडग्याळ (ता. जत) येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर दामूच्या ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.

माडग्याळ येथे खंडोबा मंदिर जवळील शेतात अशोक माळी कुटुंबासह राहतात. त्यांनी स्वत:च्या शेतात शेणखत घालण्यासाठी गावातील परीट वस्तीवरील खत विकत घेतले होते. सोमवारी सकाळी आठपासून खंडोबा मंदिर जवळील शेतात स्वतः ट्रॅक्टरने खत आणत होते. सकाळपासून दोन खेपा खत आणले होते. शेतात खत ओतून ते रिकामा ट्रॅक्टर घेऊन परीट वस्तीकडे निघाले होते.

दरम्यान गावालगत सनमडी-माडग्याळ रस्त्यावरील दामूच्या ओढ्यात लहान अरुंद पूल आहे. ओढ्यालगत वळण असून या ठिकाणी काटेरी झुडपे आहेत. यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज या ठिकाणी येत नाही. अशोक माळी ट्रॅक्टर घेऊन पुलावर आले असता समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना अचानक पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी ट्राॅली पुलाच्या कठड्याला अडकली; तर ट्रॅक्टर ओढ्यात पडला. ट्रॅक्टरचे इंजिन व स्टेअरिंगखाली अशोक माळी अडकून पडले. यात त्यांना गंभीर मार लागला होता. ग्रामस्थांनी त्वरित ट्रॅक्टर बाहेर काढले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला, छातीला जोराचा मार लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळी उमदी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास उमदी पोलिस करीत आहेत.

मयत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. ते पेपर विक्रेते भीमाण्णा माळी यांचे मोठे भाऊ होत.

टॅग्स :Accidentअपघात