शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विधवांचा सन्मान अन् पुस्तकांचा मानपान, वांगी येथील अनोखा सत्यशोधक विवाह चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:52 IST

प्रत्येक पाहुण्याला ‘शेतकऱ्याचा आसूड’ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले

मोहन मोहितेवांगी : ना मानपान, ना देवाण-घेवाण, ना वाजंत्री, ना गलबलाट अशा वातावरणात विचारांचा आहेर देत सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथे अनोखा विवाह पार पडला. पाहुण्यांना पुस्तकांची भेट अन् विधवांना सुवासिनीचा मान देत हळद दळणाचा कार्यक्रम करून नव्या विवाह प्रथेची मुहूर्तमेढ या सोहळ्यातून रोवण्यात आली.आभासी प्रतिष्ठेपायी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींची लग्न करणारे लाखो लोक आपल्याला पाहायला मिळतील. कधी लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करून श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जातं, तर कधी पैशांचं ओंगळवाणं दर्शन घडवणारे अनेक विवाह सोहळे पार पाडले जातात. मात्र, वांगी येथील परशुराम माळी या शेतकऱ्याने या चुकीच्या परंपरांवर विचारांचा आसूड ओढत नव्या प्रथेला जन्म दिला.त्यांनी त्यांच्या विजय या मुलाचा सोमवारी केलेला अनोखा विवाह समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक पाहुण्याला ‘शेतकऱ्याचा आसूड’ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले. महात्मा बसवेश्वर व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व नववधू पूनम माळी हिचा वाढदिवस हाच मुहूर्त समजून हा विवाह सोहळा पार पडला. सत्यशोधक पद्धतीने कमी खर्चात विवाह करून एक नवा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.या विवाहास आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, हर्षवर्धन पाटील, ॲड. सुभाष पाटील, मोहनराव यादव, व्ही. वाय. पाटील, सुरेश मोहिते, सरपंच वंदना सूर्यवंशी, शशिकांत माळी, महादेव होवाळ उपस्थित होते.

असा झाला विवाह सोहळामुलीकडून मुलाला कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली नाही. मानपान नाही. भांडी, वाजंत्री, वरात, घोडे असा कोणताही डामडौल नाही. मुहूर्तमेढ नाही, भटजी नाही, हार-तुरे नाहीत. मंगलाष्टक नाहीत. हळद दळण्याचा कार्यक्रमही विधवांच्या हस्ते करण्यात आला.

शेतकऱ्यांची व्यथा काय असते, हे मी स्वतः भोगले आहे. त्यामुळे विवाहासारख्या गोष्टींवर पैसा वायफळ खर्च करणे चुकीचे आहे. हाच पैसा शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणावर, शेतीच्या विकासावर खर्च करावा. यासाठी मी माझ्या दोन मुलांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केले आहेत. - परशुराम माळी, वराचे वडील

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नFarmerशेतकरी