शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

अनैतिक संबंधाच्या संशयातून संसाराची राखरांगोळी, कुणीकाेणूरच्या दुहेरी खुनाने कुटुंब उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:12 IST

निष्पाप मुलीचा दोष काय?

गजानन पाटीलदरीबडची : पती-पत्नीतील विश्वासाचे नाते संपले की कुटुंबाची राखरांगोळी कशी होते, हे जत तालुक्यातील कुणीकोणूर येथील माय-लेकीच्या खुनाने समाेर आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून बिरुदेव उर्फ बिराप्पा नाना बेळुंखी याने पत्नी प्रियांकाचा दाेरीने गळा आवळून खून केला. एवढ्यावरच न थांबता पत्नीचा खून करताना पाहिल्याने मुलगी मोहिनीचाही गळा आवळला. या साऱ्यात निष्पाप मुलीचा दोष काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत कुणीकोणूर गाव आहे. येथील सनमडी रस्त्यावर बिरुदेव उर्फ बिराप्पा बेळुंखी राहतो. चाैदा वर्षांपूर्वी त्याचा विवाह खैराव (ता. जत) येथील प्रियांका हिच्याशी झाला. उभयतांना दाेन मुले व दाेन मुली झाल्या. आई, पत्नी, दोन मुली, दाेन मुलांसमवेत संसाराचा गाडा सुरळीत चालू हाेता. माेठी मुलगी मोहिनी सातवीत, तर दाेन मुले चौथी व पाचवीत शिकत आहेत. मुलेही हुशार, चुणचुणीत आहेत.

शेतीबरोबरच पशुपालनाच्या व्यवसायाद्वारे बिरुदेवने कुटुंबाला सधनता मिळवून दिली. सध्या त्याच्याजवळ १५ जर्सी गाई आहेत. जनावरांसाठी मोठा गोठा बांधला. आधुनिक पद्धतीने पशुपालन करतो. दररोज त्याचे १८० लिटर दूध डेअरीला जाते. मोठा ट्रॅक्टर आहे. ऊसतोडीसाठी मुकदम म्हणूनही तो काम करतो. साखर कारखान्याला ऊसतोडणीच्या टोळ्या पुरवतो. भाऊ पुणे येथे उद्योगपती आहे.

मात्र दोन वर्षांपासून पती-पत्नीत बेबनाव सुरू झाला. अनैतिक संबंधाच्या संशयाचे भूत अंगात शिरले. ओळखीच्या व्यक्तीबरोबर बोलले तरीसुद्धा बिरुदेव पत्नीवर संशय घेऊ लागला. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याचा पक्का समज झाला हाेता. नातेवाइकांनी हस्तक्षेप करून अनेकदा त्यांच्यातील भांडण मिटविले. दोघांनाही समजुतीने वागण्याचा सल्ला दिला होता. पण मनात संशयाचे भूत बसलेला बिरुदेव संधीची वाट पाहत हाेता.

रविवारी त्याची आई नातेवाइकाकडे गेली होती. दुसरी मुलगी व दाेन्ही मुले हुडीबाबा जत्रेत जेवायला गेली होती. सायंकाळी अनैतिक संबंधावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. यावेळी मोठी मुलगी मोहिनी हीसुद्धा घागर घेऊन शेजारी कुपनलिकेवर पाणी आणायला गेली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बिरुदेवने दाेरीने प्रियांकाचा गळा आवळला. याच वेळी माेहिनी पाणी घेऊन घरात आली. तिने हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केली. तिच्या आवाजाने लोक जमा होतील. पोरगी पत्नीच्या खुनाची माहिती लाेकांना सांगेल, या भीतीने त्याने जवळच असलेली ओढणी घेऊन तिचाही गळा आवळला.

सुखी चाललेल्या संसाराची एका चुकीने कशी राखरांगोळी होते, याचे हे उदाहरणच. घटना घडून गेली. प्रियांकाबराेबर निष्पाप माेहिनीचाही बळी गेला. त्याची शिक्षा बिरुदेवला मिळेलच. पण आता त्यांच्या तीन लहान मुलांच्या संगोपनाचा, शिक्षणाचा प्रश्न उभा राहणार आहे. शिवाय वृद्धापकाळात आईचा सांभाळ काेण करणार? याचेही उत्तर नाहीच.

निष्पाप मुलीचा दोष काय?बिरुदेव व प्रियांकाची माेठी मुलगी मोहिनी सध्या सातवीत शिकत हाेती. अनैतिक संबंधावरून पत्नीचा खून करताना आपला कारनामा लपविण्यासाठी निर्दयी बापाने तिचाही बळी घेतला. पती-पत्नीच्या भांडणात निष्पाप मुलीचा काय दाेष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी