शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे कमी वय दाखविले, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 11:45 IST

सांगली : पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे वय कमी करून खोटी जन्मतारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा ...

सांगली : पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे वय कमी करून खोटी जन्मतारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बसाप्पा पिरगोंड हिप्परगी (रा. सिंदूर, ता. जत) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक (गृह) अरविंद बोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.जिल्हा पोलिस दलात शिपाई आणि चालक पदासाठी दि. १९ जून ते १४ जुलै दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात आली. भरतीसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून उमेदवार आले होते. शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेनंतर उमेदवार जाहीर करण्यात आले. संशयित बसाप्पा हिप्परगी हा देखील आला होता. त्याने भरती प्रक्रियेत वय कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बनावट कागदपत्रे बनवली. १९९७ चा जन्म असताना २००३ चा जन्म दाखवला. त्यासाठी त्याने आधारकार्ड, वाहन चालक परवान, शाळा सोडल्याचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनावट बनवून घेतली. कोणाच्या तरी मदतीने तयार करून घेतलेली कागदपत्रे खरी असल्याचे बसाप्पा याने भासवले.

बसाप्पा याची शारीरिक, मैदानी चाचणीतून लेखी परीक्षेला निवड झाली. त्यानंतर तो चालक पदासाठी पात्र ठरला. तात्पुरत्या अंतिम यादीत त्याची निवड निश्चित झाली होती. भरती प्रक्रियेनंतर बसाप्पा याची कागदपत्रे फेर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बसाप्पा याने सहा वर्षे वय कमी दाखवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस