जिल्ह्यातील ८० टक्के चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:52+5:302021-02-05T07:31:52+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ, संदीप सकट, कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, उपाध्यक्ष संजय सडकर, आलोक ...

जिल्ह्यातील ८० टक्के चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात
चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ, संदीप सकट, कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, उपाध्यक्ष संजय सडकर, आलोक चव्हाण, विजय वाघोले, विशाल मेहतर, रजनी धेंडवाल, गीता चव्हाण, सुमन कामत, लता लोंढे, सिंधुताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला कुटे-हिप्परकर, उपाध्यक्ष विलास गायकवाड, ज्ञानोबा मोरे, सचिव धनंजय पाटील, प्रवीण मानकापुरे यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचे धाेरण आहे. काही ठिकाणी ठेकेदारामार्फत पदे भरली जात आहेत. ठेकेदारामार्फत नोकरभरती केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. कंत्राटी आणि ठेकेदारामार्फत होणारी भरती रद्द करावी, अनुकंपा भरती विनाअट सुरू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास नोकरी मिळावी आदी मागण्यांसाठी लाक्षणिक संप केला.
संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील ८० टक्के कर्मचारी सहभागी होते, असा दावा जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने यांनी केला आहे. राज्य शासनाने आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यामुळे २० टक्के नवीन नियुक्त कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते.
फोटो आहे