शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अलमट्टीतून ७५ हजार क्युसेकने पाणी सोडले; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:36 IST

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी १९ फुटांवर

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात ८७.३५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७० टक्के भरले आहे. धरणात एक लाख ७५ हजार ७११ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्यामुळे दुपारी चारपासून ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे तेथून विसर्ग वाढविला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तर माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन पाठवून अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अलमट्टीतून बुधवारी ७५ हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. पाऊस वाढला तर अलमट्टीतून आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे कर्नाटकच्या जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यात २९.३ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) :मिरज १०.४ (१४२.९), जत १८.२ (११८.७), खानापूर ६.७ (८९.९), वाळव ८.३ (१७९.४), तासगाव ७.५ (१५६), शिराळा २९.३ (४६८.२), आटपाडी १४.८ (१००.८), कवठेमहांकाळ १६.४ (१२६.७), पलूस ६.७ (१४१.३), कडेगाव ७.१ (११३.७).

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी १९ फुटांवरजिल्ह्यात पावसाने दिवसभर उघडीप दिली असली, तरी कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना धरणाच्या विद्युतगृहातून दुपारी चारला २१०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी सहाला १९ फुटांवर गेली होती. पावसाची उघडीप असल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा वाढविला विसर्गमंगळवारी अलमट्टी धरणातून ७००० क्युसेकने विसर्ग होता. यात वाढ करून बुधवारी सकाळी १५०००, ११ वाजता ३००००, दुपारी ४२५०० आणि दुपारी चार वाजता पुन्हा वाढवून ७५००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरDamधरणfloodपूर