शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राज्यातील ७३ ऐतिहासिक तीर्थस्थळांचा होणार कायापालट, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो तीर्थस्थळ सुधार’ अभियान

By संतोष भिसे | Updated: November 17, 2023 12:27 IST

मंदिरांच्या देखभालीसाठी पाच भक्तांची समिती नियुक्त केली जाणार

संतोष भिसेसांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनातर्फे ‘नमो तीर्थस्थळ सुधार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यभरातील ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच स्थळांचा समावेश आहे. कोल्हापूररत्नागिरीतील प्रत्येकी एक व साताऱ्यातील दोन तीर्थस्थळांचाही कायापालट केला जाईल.

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मंदिरांचा जीर्णोद्धार, भाविकांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे, परिसराचे सुशोभीकरण, डिजिटल दर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ७३ ऐतिहासिक स्थळांमध्ये मंदिरे, बारव, ऐतिहासिक इमारती, तलाव यांचा समावेश आहे. त्यांचा इतिहास सांगणारे फलक क्यू आर कोडसह दर्शनी भागात लावले जाणार आहेत. मंदिरांच्या देखभालीसाठी पाच भक्तांची समिती नियुक्त केली जाणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

सांगलीतील पाच स्थळेसांगली जिल्ह्यातील पाच ऐतिहासिक मंदिरांचा कायापालट केला जाणार आहे. यामध्ये माहुली (ता. खानापूर) येथील काळम्मादेवी मंदिर, बेळंकी (ता. मिरज) येथील महादेव मंदिर, आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील आगळेश्वर मंदिर, इरळी (ता. कवठेमंकाळ) येथील महादेव मंदिर आणि कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील महादेव मंदिर यांचा समावेश आहे. या ठिकाणी लवकरच कामे सुरू होणार आहेत. या कामांत वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीतही तीर्थस्थळ अभियानआरे (ता. करवीर) येथील महादेव मंदिर, कातरखटाव (जि. सातारा) येथील कात्रेश्वर मंदिर, किकली (ता. वाई) येथील भैरवनाथ मंदिर, कसबा संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील कर्णेश्वर मंदिर यांचाही जीर्णोद्धार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विभागीय निधी आणि नियमित निधी या माध्यमातून यासाठी खर्च केला जाईल.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरRatnagiriरत्नागिरीNarendra Modiनरेंद्र मोदी