सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिका क्षेत्रात ७,०४३ दुबार मतदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:49 IST2025-11-11T19:48:54+5:302025-11-11T19:49:49+5:30

Municipal Election: एकच मतदान करता येणार, अन्य ठिकाणचे नाव ब्लॉक होणार

7043 double voters in eight municipal areas of Sangli district, information of District Collector | सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिका क्षेत्रात ७,०४३ दुबार मतदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

संग्रहित छाया

सांगली : जिल्ह्यातील आठ नगरपालिका ठिकाणी निवडणुकीची धामधूम चालू आहे. या गडबडीतच प्रशासनाच्या मतदार यादी पडताळणीमध्ये सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींच्या क्षेत्रात सात हजार ४३ दुबार मतदार सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. या मतदारांचे दोन ठिकाणी मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दुबार मतदारांशी संपर्क करून एकाच ठिकाणी मतदान करण्याबाबतची सहमती घेऊन अन्य ठिकाणचे नाव ब्लॉक करण्यात येणार आहे.

उरुण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस या नगर परिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाची मतदार याद्यी वापरून ती प्रभागनिहाय छाननी केली. जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी दोन लाख ५७ हजार ९७७ मतदारांची नोंद आहे. मतदार यादी कार्यक्रम सुरू असताना, प्रशासनाला चक्क सात हजार ४३ दुबार मतदार असल्याचे आढळून आले.

दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आला आहे. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २.७३ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील शहरी मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार नोंदी आढळणे म्हणजे डेटा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आहेत. आठ नगर परिषद, नगरपंचायतीने दुबार मतदारांची संख्या सात हजार ४३ असणे ही लक्षणीय बाब आहे. निवडणुकीपूर्वी संपूर्ण यादी तपासणे आवश्यक असल्याचे मत विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.

मतदार यादीत दुबार मतदार असले, तरी संबंधित मतदारांसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. दुबार मतदारांना विचारात घेऊन त्यांच्या पसंतीने एकाच प्रभागात मतदान करता येणार आहे. दुबार मतदार नोंदीची माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहे. संबंधित मतदार एकापेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान करणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

नगर परिषद-नगरपंचायत / एकूण मतदार / दुबार मतदार / मतदान केंद्र संख्या

  • उरुण-ईश्वरपूर / ६४,२१५ / २,५७० / ६७
  • विटा / ४६,३३२ / ९८० / ४९
  • आष्टा / ३०,५७३ / ८९२ / ३७
  • तासगाव / ३२,९९४ / ७३५ / ३६
  • जत / २८,०९० / ५५२ / ३४
  • पलूस २२,०६७ / ५९० / २६
  • शिराळा १३,०९५ / १८१ / १७
  • आटपाडी २०,६११ /५४३ / २५


उरुण-ईश्वरपूरमध्ये सर्वाधिक दुबार मतदार

जिल्ह्यात सात हजार ४३ दुबार मतदार सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ५७० दुबार मतदार उरुण-ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये आढळून आले आहेत. सर्वात कमी १८१ दुबार मतदार शिराळा नगरपंचायतीमध्ये सापडले आहेत.

Web Title : सांगली: आठ नगर क्षेत्रों में 7,043 दोहरे मतदाता मिले।

Web Summary : सांगली के आठ नगर क्षेत्रों में चुनाव की तैयारियों के दौरान 7,000 से अधिक दोहरे मतदाता पाए गए। अधिकारी यह सुनिश्चित कर रहे हैं कि मतदाता केवल एक बार मतदान करें, सहमति के बाद दोहरी प्रविष्टियाँ अवरुद्ध कर रहे हैं। उरुण-इस्लामपुर में सबसे अधिक संख्या है।

Web Title : Sangli: 7,043 duplicate voters found in eight municipal areas.

Web Summary : Over 7,000 duplicate voters were discovered across eight Sangli municipal areas during election preparations. Authorities are ensuring voters cast ballots only once, blocking duplicate entries after consent. Urun-Islampur has the highest number.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.