सांगली : कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित केले जाते. विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली.राज्यातील शासनमान्य अशासकीय १९ अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली. कला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव संतोष खोरगडे तसेच अनुदानित कला महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी व कलाकार यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती सांगलीकरांना पाहता येणार आहेत. कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे १० ते १६ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.राज्य कला प्रदर्शनांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व गौरव मानधनाच्या रकमेत दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात स्वतंत्र ललित कला विद्यापीठ स्थापन करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली होती. या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
Web Summary : Sangli will host the student section of the 65th Maharashtra State Art Exhibition in February 2026. The decision was approved at a Mumbai meeting. The artist section exhibition will be held in Mumbai. Discussions also included establishing a Fine Arts University.
Web Summary : सांगली फरवरी 2026 में 65वें महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी के छात्र वर्ग की मेजबानी करेगा। मुंबई में एक बैठक में इस निर्णय को मंजूरी दी गई। कलाकार वर्ग की प्रदर्शनी मुंबई में होगी। ललित कला विश्वविद्यालय की स्थापना पर भी चर्चा हुई।