शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

राज्यातील ६५०० आंतरवासिता डॉक्टर्स पाऊण तासाच्या ब्रेकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:54 IST

Doctor Sangli : राज्यभरातील साडेसहा हजार आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लाऊन काम केले. रुग्णसेवेत असणारे डॉक्टर्सही पाऊण तासांचा ब्रेक घेऊन यामध्ये सहभागी झाले.

ठळक मुद्देराज्यातील ६५०० आंतरवासिता डॉक्टर्स पाऊण तासाच्या ब्रेकवरआंतरवासिता डॉक्टरांची दुखणी

संतोष भिसे सांगली : राज्यभरातील साडेसहा हजार आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लाऊन काम केले. रुग्णसेवेत असणारे डॉक्टर्सही पाऊण तासांचा ब्रेक घेऊन यामध्ये सहभागी झाले.लातूर येथे आंतरवासिता डॉक्टर राहूल पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तब्बल २६ दिवस त्यांनी कोरोनाशी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूनंतरही शासनाने ५० लाखांच्या मदतीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नच्या सदस्यांनी केली. गेल्या २६ एप्रिलरोजी एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉ. राहूल यांच्या मृत्यूने कुटुंब हादरले आहे.

कोरोनाशी लढताना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास शासनाने वाऱ्यावर सोडू नये ही असोसिएशनची प्रमुख मागणी आहे.त्यासाठी सोमवारी व मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पाऊण तासांचा ब्रेक घेऊन मौन पाळण्यात येत आहे. राज्यातील खासगी व शासकीय महाविद्यालयांतील आंतरवासिता डॉक्टर्स यामध्ये सहभागी होत आहेत.

सांगलीत मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारती वैद्यकीय महाविद्यालय व इस्लामपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स सहभागी झाले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात ८५ डॉक्टर्स व सांगलीत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ६४ डॉक्टर्सनी काही मिनिटांचा ब्रेक घेऊन मौन पाळले. काळ्या फिती लावल्या. यादरम्यान, रुग्णसेवा मात्र विस्कळीत होऊ दिली नाही. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संकेत सोनवणे, डॉ. जय शाह, डॉ. सागर पवार, डॉ. राजेश्वर गजबरकर, मिहीर चिटणीस आदींनी नेतृत्व केले.आंतरवासिता डॉक्टरांची दुखणीशासनाकडून मृत्यूपश्चात ५० लाकांच्या मदतीची लेखी हमी नाही. कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचार, लसीकरण अशा कामांचा ताण असतानाही वेतन मात्र अत्यल्प आहे. बाहेरुन येणाऱ्या डॉक्टरांना प्रवासखर्च तसेच वसतीगृहातील आंतरवासिता डॉक्टरांसाठी जेवणाचा खर्च मिळत नाही. खासगी आंतरवासिता डॉक्टरांनाही वेतन व संरक्षण नाही.

टॅग्स :docterडॉक्टरSangliसांगली